Published Jan 29, 2025
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
निर्मला सीतारमण यांनी 2024 लोकसभा निवडणुकीनंतर बजेट सादर केले होते. पण ते काही महिन्यांसाठी होते.
आता संपूर्ण आर्थिक वर्षासाठी निर्मला सीतारमण याच बजेट सादर करणार आहे.
28 फेब्रुवारीला अर्थमंत्री संसदेत बजेट सादर करत होते. ही तारीख बदलण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी संध्याकाळी 5.30 वाजता बजेट सादर करण्यात येत होता.
2017 साली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटच्या तारखेत बदल करण्याची घोषणा केली.
फेब्रुवारी 28 तारखेला सादर झाल्यानंतर त्यामधील तरतूदी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात अडचणी.
या प्रशासकीय अडचणीवर मात करण्यासाठी जेटली यांनी बजेट 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याची सूचना दिली होती.