माणूस कोणत्याही देशात असो, त्याच्या श्रद्धेला, आस्थेला आणि अध्यात्मिक भावनांना एक वेगळीच जागा असते. पण या श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धत मात्र देशागणिक बदलते.
Picture Credit: Pinterest
जपानी शिंतो धर्मात "कामी" म्हणजे निसर्गातील शक्ती, आत्मा, देवता. ते लोक झाडं, डोंगर, पाणी यांच्यात दैवी शक्ती मानतात.
Picture Credit: Pinterest
थायलंडमध्ये हत्तीला पवित्र मानलं जातं. अनेक भागांत हत्तीसाठी खास पूजाअर्चा केली जाते.
Picture Credit: Pinterest
गिनिया, नायजेरिया, घाना या देशांमध्ये पूर्वजांच्या आत्म्यांना देवता मानले जाते. लोक पूर्वजांच्या आत्म्यासाठी अन्न, मद्य, फुलं अर्पण करतात.
Picture Credit: Pinterest
‘Dia de los Muertos’ ही मेक्सिकोतील एक खास परंपरा आहे. मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी त्यांच्या आवडती वस्तू, खाद्यपदार्थ, फुलं, मेणबत्त्या अर्पण केल्या जातात.
Picture Credit: Pinterest
नेपाळमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कुत्र्यांची पूजा केली जाते आणि खास पदार्थ दिले जातात. कुत्रा हा यमराजाचा दूत मानला जातो.
Picture Credit: Pinterest
चीनमध्ये ‘Heaven Worship’ प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. आकाश, निसर्गशक्ती आणि सम्राट यांच अतूट नातं मानलं जातं.
Picture Credi: Pinterest