Published August 24, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
बदाम, ओट्स आणि नारळ्याच्या दुधाचे फायदे
अनेकांना नुसतं गाईचं वा म्हशीचं दूध प्यायला आवडत नाही. यासाठी तुम्ही वेगळ्या पर्यायाची निवड करू शकता
बदाम, नारळ आणि ओट्स या पदार्थांपासून तुम्ही दूध तयार करून पिऊ शकता. स्वाद आणि पोषण दोन्ही मिळते
.
बदाम मेंदू आणि त्वचा दोन्हीसाठी उपयोगी असून अधिक प्रमाणात विटामिन ई शरीराला देते
बदाम दूध बनविण्यासाठी वरचे साल काढून टाका आणि मिक्सरमधून पाण्यासह वाटून घ्या
ओट्समध्ये फायबर, प्रोटीन आणि अनेक विटामिन्स असून याचे दूध शरीराला फायदेशीर ठरते
ओट्सचे दूध बनविण्यासाठी पाणी, साखर आणि मधाची गरज भासते
नारळाच्या दुधाचे आरोग्याला खूपच फायदे मिळतात. हृदय चांगले राहून प्रतिकारशक्तीही अधिक मिळते
नारळ खरवडून घ्या, तो तुम्ही थोड्याशा पाण्यासह ब्लेंडरमधून वाटा आणि त्यातील दूध काढून चाळून घ्या