Published Feb 15, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
आपला स्मार्टफोन हॅकर्सपासून सुरक्षित राहावा, यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो.
आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेऊ शकता.
तुमचा फोन नेहमी मजबूत पासवर्ड, पिन किंवा बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनने सुरक्षित करा.
तुमच्या स्मार्टफोनमधील सॉफ्टवेअर आणि अॅप्स नियमित अपडेट ठेवा.
अनेक अॅप्स अशा परवानग्या मागतात ज्यांची त्यांना आवश्यकता नसते, असे अॅप्स वापरताना काळजी घ्या.
सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क अनेकदा असुरक्षित असतात आणि त्यांचा वापर धोकादायक ठरू शकतो.
ब्लूटूथ आणि लोकेशन सक्षम ठेवल्याने तुम्हाला ट्रॅकिंग आणि सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागू शकते.
स्टँडर्ड टेक्स्ट मॅसेज एन्क्रिप्टेड नसतात, त्यामुळे तुमचे चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्स वापरा.
गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअर सारख्या विश्वसनीय स्त्रोतांकडूनच अॅप्स डाउनलोड करा.
तुमचा फोन हरवला किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते, फोनमध्ये रिमोट वाइप आणि फाइंड माय डिवाइस इनेबल करा.
प्रायव्हसी-फोकस्ड ब्राउजर आणि सर्च इंजिनचा वापर करा.
क्लाउड बॅकअप संवेदनशील माहिती साठवू शकतात. जर तुम्ही याचा वापर करत असल्यास काळजी घ्या.