www.navarashtra.com

Published Oct 19,  2024

By  Harshada Jadhav

घरासाठी वॉशिंग मशीन खरेदी करायचा आहे? या टीप्स वाचा

Pic Credit -  pinterest

घरी वॉशिंग मशीन असले तर आपला बराच वेळ वाचतो आणि इतर काम करता येतात.

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशीन खरेदी करताना आपल्या घरासाठी कोणती मशीन योग्य असेल याबाबत बऱ्याचदा गाोंधळ असतो.

खरेदी

तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी तुम्ही या सोप्या टीप्स वाचा 

सोप्या टीप्स

सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन काही कामे स्वतः करू शकतात, परंतु पाण्याची टाकी भरणे किंवा धुतलेले कपडे कोरड्या टबमध्ये हलवणे यासारखी कामे आपल्याला करावी लागतात.

सेमी ऑटोमॅटीक 

या मशीन्स बटणाच्या स्पर्शाने सर्वकाही स्वतः करतात. यामध्ये फ्रंट-लोड वॉशिंग मशीन आणि टॉप-लोड वॉशिंग मशीन असे दोन प्रकार आहेत. 

फुल्ली ऑटोमॅटीक 

वॉशर-ओन्ली वॉशिंग मशिन लहान जागेसाठी फायदेशीर आहे. जसे की अपार्टमेंट किंवा लहान घर, अशा ठिकाणी तुम्ही या मशिनचा वापर करू शकता. 

वॉशर-ओन्ली वॉशिंग मशिन

ज्यांना मोठ्या प्रमाणात कपडे कोरडे करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी या मशिन बेस्ट आहे. या मशीनमध्ये केवळ कपडे सुकवले जातात. 

ड्रायर्स ओन्ली वॉशिंग मशिन

वॉशर ड्रायर - फ्रंट लोड + टॉप लोड हे एकच युनिट आहे जे तुमचे कपडे धुते आणि वाळवते. यात दुहेरी वॉशरचा समावेश आहे.

वॉशर-ड्रायर कॉम्बो

मोठ्या कुटुंबाला जास्त भार क्षमता असलेल्या मशीनची आवश्यकता असते. त्यामुळे अशा मशीनची निवड करा जी एकाच वेळी अधिक कपडे धुवू शकेल. 

तुमच्या कुटुंबाचा आकार

तुम्ही रोजच्या कपड्यांच्या क्षमतेनुसार वॉशिंग मशीन खरेदी करू शकता. वॉशिंग मशीनची क्षमता सामान्यतः किलोग्रॅममध्ये मोजली जाते. 

वॉशिंग मशिन क्षमता

तुमचे बजेट कमी असल्यास, तुम्ही बेसिक टॉप-लोड वॉशर शोधा. हे सहसा सर्वात परवडणारे असतात. 

बजेट