Published August 30, 2024
By Preeti Mane
Pic Credit -iStock
'या' दागिन्यांनी वाढवा घराच्या बाप्पांचे लोभस रुप
विविध स्टोनची कलाकुसर असलेले चांदीचे मुकूट अतिशय सुंदर दिसतात. यामुळे रुप अधिक सुंदर बनते.
गणपती बाप्पाला फेटा घालण्याचा ट्रेन्ड आला आहे. कापडी रंगीबेरंगी फेटे आणि भले मोठे तुरे बाप्पाचा लूक बदलत आहेत.
.
गणपती बाप्पाच्या दोन कानातील कफ सोन्याच्या आणि चांदीमध्ये येतात. त्यावर देखील स्टोन लावलेले असतात.
चांदींची कंठी अतिशय सुंदर दिसते. यावर खासकरुन लाल रंगाचे काम केलेले असते. तसेच खऱ्या फुलांची कंठी देखील सुंदर दिसते.
अनेक प्रकारचे मोत्याचे हार उपलब्ध आहेत. विविध रंगी मोती आणि स्टोन वर्क असलेले हार सौंदर्य वाढवतात.
दागिन्यांमध्ये मोदकाचा हार अनेकांची पसंती आहे. बाप्पाच्या आवडीच्या 21 मोदकांचा हार खरेदी केला जातो.
सोंडेवर सुंदर अशी सोंडपट्टी मिळते. चांदीचे काम असणारी ही पट्टी विविध डिझाईनमध्ये उपलब्ध आहे.
बाप्पांच्या मागील दोन हातांमध्ये दोन आयुध असतात. त्यापैकी एक त्रिशुल व परशू शोभा वाढवतात.
गणपती बाप्पाच्या चार हातांमध्ये तोडे घालता येतात. सोन्याची आणि चांदींची ही गहू तोडे रुपांमध्ये भर घालतात
गणपती बाप्पाला जास्वंदीचे फुल आवडते. त्यामुळे चांदीचे फुल बाप्पासमोर ठेवल्याने शोभा वाढते.