वसंत पंचमी हा सण शिक्षण, ज्ञान आणि नवीन उर्जेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. राशीनुसार कोणते दान करावे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी वसंत पंचमीला लाल वस्त्र किंवा गूळ दान करणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. तर वृषभ राशीच्या लोकांनी तांदूळ आणि पांढऱ्या मिठाईचे दान करावे.
मिथुन राशीच्या लोकांनी पुस्तके आणि पेन दान करणे फायदेशीर आहे. तर कर्क राशीच्या लोकांनी दूध किंवा तांदूळचे दान करावे.
सिंह राशीच्या लोकांनी गहू किंवा तांबे दान करणे सर्वोत्तम मानले जाते. तर कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या भाज्या किंवा हिरवे कपडे दान करणे शुभ मानले जाते.
तूळ राशीच्या लोकांनी वसंत पंचमीला पांढऱ्या रंगांचे कपडे दान करावेत. तर वृश्चिक राशीच्या लोकांनी गूळ आणि तिळाचे दान केल्याने जीवनातील अडथळे दूर होऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांनी पिवळे कपडे किंवा हरभरा दान करावे. तर मकर राशीच्या लोकांनी तिळाचे दान करणे फायदेशीर मानले जाते. त्यामुळे कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांनी लोखंडी वस्तू दान कराव्यात. असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगांच्या मिठाईचे दान करावे. त्यामुळे मानसिक शांती मिळते.
वसंत पंचमीला दान करणे महत्त्वाचे मानले जाते. दानांसह देवी सरस्वतीचे स्मरण केल्याने ज्ञान आणि बुद्धीचे आशीर्वाद मिळतात. या दिवशी पिवळा रंग परिधान करणे विशेषतः शुभ मानले जाते.