वसंत पंचमीचा सण हिंदू धर्मामध्ये 23 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते.
या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. पिवळा रंग समृद्धी, ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगांच्या मिठाईंचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते.
वसंत पंचमीच्या दिवशी बेसनची बर्फी, केसर भात, राजयोग, मूग डाळीचा हलवा, रव्याचा हलवा या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा.
बेसन तुपामध्ये भाजून घ्या. त्यात वेलची पावडर आणि साखर टाका. हे मिश्रण एकत्र करून एका ताटामध्ये घेऊन थंड करून घ्या. थंड झालेल्या मिश्रणाचे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ते कापून घ्या.
तांदूळ कुकरमध्ये शिजवून घ्या त्यामध्ये दूध, साखर आणि केशर मिसळा. तांदूळ शिजल्यानंतर काजू, बदाम आणि मनुके यांसारखे सुका मेवा टाकून सजवा. केशर भात प्रसाद म्हणून गरमागरम तुम्ही खाऊ शकता
राजभोग एक भारतीय पारंपरिक मिठाई आहे. दूध उकळून त्यामध्ये लिंबू पिळून ते फाटून द्या. त्या चोथ्याचे छोटे छोटे गोळे बनवा. त्याला साखरेच्या पाकामध्ये शिजवा आणि वरून सुकामेवा आणि केशर लावून सजवा.
मूग डाळीचा हलवा हा पौष्टिक पदार्थ आहे. मूग डाळीची पेस्ट बनवून तुपामध्ये ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि सुकामेवा टाकून ते घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. या हलव्यात चवीसोबतच प्रथिने भरपूर असतात.
रव्याचा हलवा किंवा शिरा जे लहान मुलं ते वृद्धांपर्यंत सर्वांना आवडते. हे बनवण्यासाठी रवा तुपामध्ये भाजून घ्या. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये साखर आणि केशर टाका. शेवटी बदाम काजू आणि पिस्त्याने त्याला सजवून घ्या.