www.navarashtra.com

Published Jan 13,  2025

By  Prajakta Pradhan

घरातील देव्हाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवू नये

Pic Credit -  pinterest

वास्तूशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक गोष्टीसाठी काही खास नियम दिलेले आहेत. ज्याची काळजी घ्यावी 

वास्तूशास्त्र

वास्तूनुसार, देव्हाऱ्यात देवाच्या तुटलेल्या मूर्त्या किंवा चित्र लावू नये. असे केल्याने व्यक्तीच्या घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

तुटलेल्या मूर्त्या

घरातील देव्हाऱ्यात कधीही कैच किंवा तीक्ष्ण वस्तू ठेवू नये. असे केल्यास व्यक्तीच्या घरात नकारात्मकता येते. त्यामुळे शांतताही बिघडते

कैची ठेवू नका

देवाला वाहिलेली फुले किंवा हार सुकायला लागल्यास तेथून लगेच काढून टाकावे. असे मानले जाते की या चुकीमुळे देवाचा कोप होतो.

सुकलेली फुले

चुकूनही देव्हाऱ्यात कधीही आई वडिलांचे फोटो लावू नये. वास्तूनुसार असे केल्याने व्यक्तीला वास्तूचे अशुभ आशीर्वाद मिळू शकतात.

आई वडिलांचे फोटो

असे मानले जाते की, देव्हाऱ्यात एकापेक्षा अधिक शंख ठेवू नये. असे केल्याने व्य्क्तीला अशुभ फळ मिळते.

एकापेक्षा अधिक शंख

घरातील देव्हाऱ्यात तुटलेला तांदूळ ठेवल्यास लगेच काढून टाका. त्याऐवजी तुम्ही संपूर्ण तांदूळ हळदीत भिजवू शकता.

तांदूळ

असे मानले जाते की, चुकूनही घरातील देव्हाऱ्यात देवी देवतांचे उग्र स्वरूपातील फोटो लावू नये. असे करणे शुभ मानले जात नाही.

उग्र स्वरूपातील देवाचा फोटो