अंकिता वालावलकरची पहिलीच वटपौर्णिमा; पिंक नऊवारी साडी नेसून केली पूजा!

Entertainment

10 June, 2025

Editor: चेतन बोडके

प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर अंकिता वालावलकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

अंकिता वालावलकर

Picture Credit: Instagram

आज वटपौर्णिमा आहे, अंकिताची ही लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आहे. तिने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत. 

वटपौर्णिमा २०२५

अंकिताने वटपौर्णिमानिमित्त फोटोज् शेअर केले आहेत. ज्यात ती वडाच्या झाडाची पूजा करताना दिसते. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर अंकिता आणि कुणालने कॅमेऱ्यासमोर रोमँटिक पोजेस देखील दिल्या. 

रोमँटिक पोजेस

पूजेवेळी अंकिताने पिंक कलरची साडी आणि गोल्डन स्टायलिश ब्लाऊज कॅरी करत सुंदर फोटोशूट केले आहे. 

सौंदर्य

तर लूकला साजेसा मेकअप करत आणि लूकला साजेसे दागिने कॅरी करत अभिनेत्रीने एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत. 

लूक

तर, कुणालने क्रीम कलरचा कुर्ता आणि पिंक कलरचा पायजमा कॅरी करत कॅमेऱ्यासमोर दमदार फोटो पोजेस दिले आहेत. 

कुणालचा लूक

अंकिता आणि कुणालने फेब्रुवारी २०२५ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर या मराठमोळ्या सेलिब्रिटी कपलची पहिलीच वटपौर्णिमा आहे. 

लग्नगाठ

अंकिता आणि कुणालच्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव