बाप्पाला कोणत्या रंगाची फुले आवडतात

Lifestyle

16 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

विनायक चतुर्थी कधी 

श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी रविवार, 16 ऑगस्ट रोजी आहे. या विनायक चतुर्थीला दुर्वा विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते. 

Picture Credit: Pinterest

श्रावण शुक्ल चतुर्थीची सुरुवात शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:२८ वाजता होणार आहे आणि या चतुर्थी तिथीची समाप्ती रविवार, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:५२ वाजता संपेल. त्यामुळे, उदयतिथीनुसार, विनायक गणेश चतुर्थीचा उपवास आणि पूजा १६ ऑगस्ट रोजी केली जाणार आहे.

विनायक चतुर्थी मुहूर्त

Picture Credit: Pinterest

लाल जास्वंद हे गणपतीला अर्पण केले जाणाऱ्या प्रमुख फुलांपैकी एक मानले जाते. गणपतीच्या पूजेत लाल रंगाला विशेष महत्त्व असल्याची धार्मिक मान्यता आहे.

जास्वंद

Picture Credit: Pinterest

झेंडूची फुलेही गणपतीच्या पूजेसाठी वापरली जातात. काही परंपरांमध्ये लाल आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करण्याची पद्धत आहे.

लाल किंवा पिवळा झेंडू

Picture Credit: Pinterest

लाल कमळ उपलब्ध असल्यास गणपतीला अर्पण केले जाते. लाल रंगाच्या फुलांना गणेशपूजेत विशेष स्थान असल्याचे काही धार्मिक ग्रंथ आणि परंपरांमध्ये नमूद केले आहे.

लाल कमळ

Picture Credit: Pinterest

दुर्वा

Picture Credit: Pinterest

गणपतीच्या पूजेत फुलांइतकेच दुर्वेला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार विषम संख्येने किंवा २१ दुर्वांच्या जुड्या अर्पण केल्या जातात.

कोणती काळजी घ्यावी

Picture Credit: Pinterest

गणपतीला कोणतेही फूल अर्पण करताना ते स्वच्छ, ताजे आणि श्रद्धेने अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. फुलांचा रंग किंवा प्रकार हा प्रदेश आणि कुटुंबाच्या पूजापद्धतीनुसार बदलू शकतो.