मुंबईतील या प्रसिद्ध गणेश मंदिरांना द्या भेट 

Religion

05 April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज रविवार, 5 एप्रिल रोजी आहे. यावेळी चंद्रोदय रात्री 9.58 वाजता आहे.

संकष्टी चतुर्थी

Picture Credit: Pinterest

शिवाजी पार्क, दादर’येथील असलेले गणेशमंदिर. 1966 साली एका व्यक्तीला वडाच्या झाडाखाली गणेशाची छोटी मूर्ती सापडली. ज्या वडाच्या झाडाखाली गणेशाची मूर्ती प्रकट झाली, त्याच ठिकाणी 1970 साली गणेशमंदिर बांधण्यात आले.  

उद्यान गणेश, दादर

Picture Credit: Pinterest

बोरिवली पश्चिमेकडील वझिरा नाका येथील गणेशमंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी कोळी बांधव, भंडारी समाज आणि स्थानिक ग्रामस्थच मंदिरात दर्शनासाठी येत असत. या मंदिराची ख्याती वाढल्याने मुंबईतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात

गणेशमंदिर, बोरिवली

Picture Credit: Pinterest

 या मंदिरातील गणेशमूर्ती संगमरवरी असून सोन्याचा मुकुटाने आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेली आहे. इच्छापूर्ती करणारा गणेश म्हणून वांच्छा. सिद्धिविनायक असे संबोधले जाते. 

वांच्छा सिद्धिविनायक मंदिर, अंधेरी

Picture Credit: Pinterest

पार्लेश्वर गणपती मंदिर, विलेपार्ले

विलेपार्ले स्थानकानजीक पार्लेकरांचे श्रद्धास्थान असलेले पार्लेश्वर मंदिर आहे. मूळ मंदिर भगवान शंकराचे असले, तरी मंदिराच्या उजव्या बाजूला गणपतीचे मंदिर आहे. गणेशभक्त श्रद्धेने येथील गणपतीची पूजा करतात.

Picture Credit: Pinterest

1890 साली फडकेवाडीत या गणेशमंदिराची स्थापना केली. पतीच्या अकाली निधनामुळे निपुत्रिक असलेल्या यशोदाबाईंनी गणपतीलाच आपले पुत्र मानले आणि मंदिराची उभारणी केली. 

फडके गणपती मंदिर, गिरगाव

Picture Credit: Pinterest

दक्षिण भारतातील अदी द्रविड या समाजाने 1913 साली धारावीतील या गणेशमंदिराची उभारणी केली. तामिळनाडूतील हा समाज मुंबईत आला आणि धारावीमध्ये राहून चामड्याचा व्यवसाय करू लागला.

गणेशमंदिर, धारावी

Picture Credit: Pinterest

भारतात ठिकठिकाणी आपल्याला लेणी पाहायला मिळतात. लेण्यांमधून वास्तुशिल्पांचे, चित्रांचे अनेक नमुने आपली संस्कृती अधोरेखित करताना दिसतात. मुंबईत मागाठाणे, कान्हेरी, मंडपेश्वर, जोगेश्वरी इत्यादी ठिकाणीदेखील लेण्या आहेत.

गणेशमंदिर, जोगेश्वरी

Picture Credit: Pinterest

फेब्रुवारी 1984मध्ये माघी गणेश चतुर्थीनंतर येणार्‍या संकष्टीला मंदिरात काळ्या रंगाची गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली. तेव्हापासून या गणपतीला ‘मुंबईतील काळा गणपती’ म्हणून ओळखले जाते.

काळा गणपती गोरेगाव

Picture Credit: Pinterest