अनेकदा आपण देवघरात किंवा मंदिरात गेल्यावर कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे अष्टगंध नक्की कोणत्या ८ पवित्र गोष्टींपासून बनवले जाते आणि त्याचे फायदे काय आहेत?
Picture Credit: Pinterest
चंदनाचा वापर प्रामुख्याने सौंदर्यवर्धन, आरोग्य सुधारणा आणि धार्मिक कार्यासाठी केला जातो. शरीराला आणि मनाला शीतलता देते.
Picture Credit: Pinterest
पावित्र्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. हिंदू धर्मात केशर अत्यंत पवित्र मानले जाते. कोणत्याही देवपूजेत, अभिषेकात किंवा यज्ञाच्या वेळी केशर वापरणे शुभतेचे प्रतीक मानले जाते.
Picture Credit: Pinterest
हिंदू धर्मात कस्तुरीचा वापर देवपूजा, अभिषेक आणि मंदिरांमधील पवित्र विधींमध्ये केला जातो. यामुळे मनाची एकाग्रता वाढवण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
हिंदू धर्मात पूजेदरम्यान कापूर जाळणे अत्यंत शुभ मानले जाते. याच्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वामुळे वातावरणातील वातावरणातील नकारात्मकता दूर करून शुद्धी करतो. मन शांत होते आणि हवा शुद्ध राहते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
गोरोचन हा गाय किंवा बैलाच्या पित्ताशयात तयार होणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र पदार्थ आहे. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात याला अत्यंत उच्च स्थान दिले गेले आहे.
Picture Credit: Pinterest
अगरूच्या लाकडाचा उपयोग यज्ञ आणि हवनात आहुती देण्यासाठी केला जातो. असे मानले जाते की, हवनात अगरू टाकल्याने वातावरण शुद्ध होते आणि आजार दूर होतात. आध्यात्मिक अनुभूती आणि सुगंध वाढवतो.
Picture Credit: Pinterest
रक्तचंदन आणि कुंकू या दोन्ही गोष्टी भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जातात. हे केवळ धार्मिक विधींचे प्रतीक नसून त्यांचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. याला ऊर्जा आणि शक्तीचा स्रोत देखील म्हटले जाते.
Picture Credit: Pinterest
जटामांसी ही हिमालयात आढळणारी एक अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मानसिक शांतता, आध्यात्मिक उन्नती आणि आरोग्यासाठी हिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे