तुळस हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जाणारे औषधी वनस्पती असून, आयुर्वेदातही तिचे विशेष महत्त्व आहे. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिणे ही एक साधी पण प्रभावी सवय मानली जाते.
Picture Credit: Pinterest
रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने गॅस, आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि अपचन कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
गॅस, ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
Picture Credit: Pinterest
रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, सर्दीपासून त्वरित आराम मिळतो. तुळशीमध्ये विटॅमिन सी, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
Picture Credit: Pinterest
रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढवते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
तुळस ही एक औषधी वनस्पती मानली जाते, जी तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करते. तिचे पाणी प्यायल्याने कॉर्टिसोलची पातळी कमी होऊन शांतता वाढते आणि मानसिक थकवा दूर होतो.
Picture Credit: Pinterest
एका ग्लास पाण्यात तुळशीची ५-६ पाने उकळा, ते पाणी गाळून घ्या आणि कोमट प्या. हे पाणी नियमितपणे प्यायल्याने अनेक आरोग्य समस्या टाळता येतात.
Picture Credit: Pinterest