आवळा हे विटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सचे नैसर्गिक भांडार आहे. पेशींचे रक्षण करणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि पचन सुधारणे यांसारख्या गुणांमुळे त्यास 'सुपरफूड' मानले जाते. आवळ्या खाण्याचे फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षाही जास्त विटॅमिन सी असते. यामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते.
Picture Credit: Pinterest
यातील गुणधर्म कोलेजन तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे केस मजबूत होतात, गळती थांबते आणि त्वचेला नैसर्गिक तेज येते.
Picture Credit: Pinterest
आवळा खाल्ल्याने पोटातील ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास कमी होतो. पचनसंस्था मजबूत होऊन अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
नियमित आवळ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
आवळ्यात विटॅमिन ए' मुबलक प्रमाणात असते, जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि डोळ्यांचे आजार दूर ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
Picture Credit: Pinterest
आवळा चयापचय गतिमान करतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते