मोदकांचे विविध प्रकार कोणते, जाणून घ्या

Religion

05 April 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

मोदकाचे विविध लोकप्रिय

उकडीच्या आणि तळणीच्या मोदकाव्यतिरिक्त मोदकांचे अनेक प्रकार आहेत. जसे की, ड्रायफ्रूट, चॉकलेट, मलाई, खवा, आणि केशर मोदक. संकष्टी चतुर्थीला कोणत्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

तांदळाची उकड काढून सारण भरून वाफवलेले मोदक हे सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट आहेत. संकष्ट चतुर्थीला गणपतीला हेच मोदक नैवेद्य म्हणून दाखवले जातात.

उकडीचे मोदक 

Picture Credit: Pinterest

मैदा किंवा गव्हाच्या पिठात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून तळून केलेले हे मोदक जास्त करून घाटमाथ्यावर प्रसिद्ध आहेत.

तळलेले मोदक

Picture Credit: Pinterest

खजूर, अंजीर, बदाम, काजू वापरून साखर किंवा गूळ न वापरता बनवलेले आरोग्यदायी मोदक म्हणून ही ओळखले जातात.

ड्रायफ्रूट मोदक

Picture Credit: Pinterest

चॉकलेट मोदक

काळाप्रमाणे जसे बदल होतात. तसेच मोदकातील हे बदल आहे. मोदकाच्या आकारातही हे चॉकलेट मोदक मिळू लागले आहेत, डार्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेट वापरून बनवलेले असतात.

Picture Credit: Pinterest

शाही मोदक बनवण्याची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी. नारळ, कंडेन्स मिल्क, बदाम, पिस्ता, काजू आणि वेलची पावडर यांचा वापर करून तयार केलेले हे मोदक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

केशर मलाई मोदक

Picture Credit: Pinterest

पिठीसाखर, वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरून हे मऊ मोदक बनवले जातात. मंद आचेवर खवा परतून, साखर व सुगंधी द्रव्ये मिसळून मोदक साच्याच्या मदतीने हे मोदक तयार होतात.

खवा मोदक

Picture Credit: Pinterest

हे उन्हाळ्यातील एक विशेष पक्वान्न आहे, जे चवीला अतिशय अप्रतिम लागतात. तुम्ही हे मोदक दोन प्रकारे बनवू शकता. पारंपरिक उकडीचे आंबा मोदक किंवा झटपट होणारे मँगो मावा मोदक 

आंब्याचे मोदक

Picture Credit: Pinterest

गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलकंद वापरून बनवलेले सुगंधी मोदक 

गुलकंद/गुलाब मोदक 

Picture Credit: Pinterest