कांद्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हृदयापासून पचनक्रियेपर्यंत कांद्याचे आठ महत्त्वाचे फायदे आहेत
Picture Credit: Pinterest
कांद्यामध्ये ‘क्वेरसेटिन’नावाचे फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तदाब कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात. हे आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंना पोषण देतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
Picture Credit: Pinterest
कांद्यातील सल्फर आणि फायटोकेमिकल्स इन्सुलिनची पातळी सुधारतात, ज्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी कांदा फायदेशीर मानला जातो.
Picture Credit: Pinterest
यात विटॅमिन ‘सी’ आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पांढऱ्या पेशींचे कार्य सुधारून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
कांद्यामध्ये ‘सल्फर’युक्त संयुगे असतात, जे कोलन आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात
Picture Credit: Pinterest
काही अभ्यासानुसार, नियमित कांदा खाल्ल्यामुळे हाडांची घनता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिसचा (हाडे ठिसूळ होणे) धोका टळू शकतो.
Picture Credit: Pinterest
कांद्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून (Free radicals) होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात आणि त्वचेचे आरोग्य सुधारतात.
Picture Credit: Pinterest
कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि उष्णतेपासून बचाव होतो.