परफेक्ट कांदा भजी घरी कसे बनवायचे? 

Life style

30 June 2026

Author:  नुपूर भगत

पावसाळा ऋतू सुरू झाला असून या सिजनमध्ये गरमा गरम कांदा भजी खाण्याची फार इच्छा होत असते. 

पावसाळा 

Picture Credit: Pinterest

चिरलेल्या कांद्यामध्ये मीठ घालून १० मिनिटे बाजूला ठेवा. त्यामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि भजी अधिक चविष्ट होतील.

कांद्याला मीठ लावा

Picture Credit: Pinterest

कांद्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, ओवा, हिंग, हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. आवश्यक असल्यासच थोडंसं पाणी घालून मिश्रण बनवा.

पीठ तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत तळण्यासाठी पुरेसं तेल गरम करा. तेल मध्यम आचेवर चांगलं तापलं की भजी तळण्यासाठी तयार ठेवा.

 तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

मिश्रणाचे छोटे-छोटे भाग तेलात सोडा. भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

भजी तळा

Picture Credit: Pinterest

तळलेली भजी टिश्यू पेपरवर काढा, त्यामुळे अतिरिक्त तेल शोषले जाईल आणि भजी अधिक कुरकुरीत राहतील.

अतिरिक्त तेल काढा

Picture Credit: Pinterest

कुरकुरीत कांदा भजी हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरम चहासोबत लगेच सर्व्ह करा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या.

गरमागरम सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest