8Published Feb 20, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - pinterest, istock
हिंदू धर्मामध्ये सूर्योद्यापासून सूर्यास्तापर्यंत नियम बनवले आहेत. यामुळे व्यक्तीची शुद्धता तर राहतेच पण आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ती उत्तम असते.
शास्त्रानुसार, जेवणाचे सर्व नियम पाळले तर माणसाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही.
.
ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही प्रवचनाच्या वेळी जेवणाशी संबंधित काही नियम सांगितले आहेत. जाणून घेऊया या नियमांबद्दल
शास्त्रानुसार, शिजवलेले अन्न पुन्हा गरम करून खाऊ नये.
ब्रम्हचारी, भिक्षू आणि विधवा यांनी पान खाणे टाळावे.
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले दूध किंवा मध, भांड्यात ठेवलेले तूप, मीठ मिसळलेले दूध आणि पितळेच्या भांड्यात ठेवलेले नारळपाणी पात्र नाही.
जेवण करताना डाव्या हाताने पाणी पिऊ नये. शास्त्रानुसार, डाव्या हाताने पाणी पिणे हे दारू पिण्यासारखे आहे.
जेवताना जर तुम्ही डाव्या हाताने ग्लास उचलला तर पाणी पिण्यापूर्वी उजवा हात भांड्याखाली ठेवा.
जे अन्न आपण देवाला अर्पण करू शकत नाही ते आपण कधीही खाऊ नये. तसेच जेवल्यानंतर उरलेले अन्न खाऊ नये.
कार्तिक महिन्यात वांगी, माघ महिन्यात मुळा आणि पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणे टाळावे. उपनयन ब्राह्मणाने मासे खाऊ नयेत
प्रतिपदेला भोपळा, द्वितीयेला बृहती, तृतीयेला परवाळ, चतुर्थीला मुळा, पंचमीला बेल, षष्ठीला कडुनिंब, सप्तमीला खजूर, अष्टमीला नारळ आणि नवमीला करवंद खाऊ नये.