www.navarashtra.com

Published Dec 21,  2024

By  Mayur Navle

पॉपकॉर्न खाणे शरीरासाठी फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या   जाणून घ्या कारण 

Pic Credit -   iStock

थेटर्समध्ये अनेकदा आपण पॉपकॉर्नस खात असतो. पण पॉपकॉर्न खाणे फायदेशीर आहे कि नाही याबद्दल जाणून घेऊया. 

पॉपकॉर्न

पॉपकॉर्नमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते, जे पचन क्रियेसाठी फायदेशीर आहे.

हाय फायबर्स

जर कमी बटरमध्ये पॉपकॉर्न बनवले तर त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते, जे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करू शकते.

लो कॅलरी

पॉपकॉर्नमध्ये पोलिफेनोल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.

अँटीऑक्सिडंट्स

पॉपकॉर्नमध्ये लहान प्रमाणात बी-व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम, फास्फरस, आणि जिंक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. 

व्हिटॅमिन्स आणि खनिजे

पॉपकॉर्न खाण्याचे तोटे सुद्धा आहेत, ज्याबद्दल आता जाणून घेऊया. 

तोटे सुद्धा आहेत

बाजारात उपलब्ध असलेल्या पॉपकॉर्नमध्ये, विशेषतः मायक्रोवेव्ह पॉपकॉर्नमध्ये, कृत्रिम फ्लेवर्स असते, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.

प्रोसेस्ड पॉपकॉर्न

.

बरेच पॉपकॉर्न ब्रँड्स जास्त सोडियमयुक्त असतात, जे रक्तदाब वाढवू शकते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी  हानिकारक ठरू शकते. 

सोडियमचं प्रमाण जास्त

.

या परंपरांशिवाय ख्रिसमस सेलीब्रेशन अपूर्ण