मुलं ही देवाघरची फुलं असं म्हणतात.मुलांना शिस्त लागावी म्हणून पालक मुलांना ओरडतात.
Img Source: Pintrest
मात्र तुम्ही जर तुमच्या मुलांना सतत ओरडत असाल तर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
मुलांवर सतत ओरडल्याने मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो.
सतत ओरडल्याने मुलांना स्वतःबद्दल नकारात्मक भावना वाटू लागते.
पालक सतत ओरडत असतील तर मुलं भीती बाळगून राहतात.
घरात मुलांना जशी वागणूक मिळते, तशीच वागणूक मुले इतरांशी करतात.
मुलांना आपले आईवडील समजून घेत नाहीत असे वाटते.
आत्मविश्वास गमावल्यामुळे शैक्षणिक आयुष्य़ावर याचा परिणाम होतो.
लहान वयातच मुलांना पालकांविषयी राग, चिडचिड, नैराश्य निर्माण होऊ शकते.
ओरडल्याने तात्पुरती शिस्त लागू शकते, पण प्रेम, समजूत आणि संयमाने मुलांचा पालकांशी चांगला संवाद होतो.