विटॅमिन बी १२ची लक्षण कोणती जाणून घ्या

Lifestyle

13  February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

काही लोकांना सतत थकवा जाणवतो. जास्त काम न करताही शरीर जड वाटते. पुरेशी झोप घेतल्यानंतरही ऊर्जा कमी राहते.

वारंवार थकवा जाणवणे

Picture Credit: Pinterest

सततचा थकवा, अशक्तपणा आणि एकाग्रतेचा अभाव हे रक्त आणि मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या विटॅमिन बी १२ च्या कमतरतेशी जोडलेले असू शकते.

विटॅमिन बी १२ ची लक्षण

Picture Credit: Pinterest

बी१२ हे प्रामुख्याने मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमधून मिळते. शाकाहारी आहार, पचन समस्या किंवा वृद्धत्व यामुळे ही कमतरता उद्भवू शकते. याची कमतरता कशी दूर करायची जाणून घ्या

काय असतात लक्षण

Picture Credit: Pinterest

मांस, अंडी, मासे, पनीर आणि दूध यामध्ये विटॅमीन बी 12 भरपूर प्रमाणात असते. याचा नियमितपणे आहारात समावेश केल्याने शरीराला चांगले पोषण तत्व मिळतात. 

विटॅमिन बी १२ असलेले घटक

Picture Credit: Pinterest

कमतरता दूर करणे

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विटॅमिन बी १२ पूरक औषधे किंवा इंजेक्शन्स घेता येतात. हे शरीरातील कमतरता लवकर भरून काढते आणि थकवा दूर करते.

Picture Credit: Pinterest

झोप पूर्ण करणे, ताण कमी करणे आणि पौष्टिक आहार खाल्ल्याने बी१२ चे शोषण सुधारते. नियमित, हलका व्यायाम देखील ऊर्जा वाढवतो.

जीवनशैलीमध्ये बदल

Picture Credit: Pinterest

जर वारंवार थकवा जाणवत असेल तर रक्त तपासणी करावी. वेळेवर निदान आणि योग्य उपचारांनी बी१२ ची कमतरता आणि त्याची लक्षणे सहजपणे नियंत्रित केली जाऊ शकतात.

वेळेवर तपासणी

Picture Credit: Pinterest