स्टार्टर्ससाठी परफेक्ट ठरेल कटोरी चाट

Life style

12 february 2026

Author:  नुपूर भगत

मैदा, रवा, मीठ आणि तेल एकत्र करून चांगले मिसळा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळा. 15 मिनिटे झाकून ठेवा.

पीठ मळणे

Picture Credit: Pinterest

पीठाचे छोटे गोळे करून पुऱ्यासारखे लाटा. छोट्या वाटीच्या बाहेरून पुऱ्या बसवून आकार द्या.

 कॅटोऱ्या तयार करणे

Picture Credit: Pinterest

गरम तेलात वाटीसकट किंवा काळजीपूर्वक आकार धरून सोडा. सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. थंड झाल्यावर वाटी काढा.

 तळणे

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात बटाटे, चणे, कांदा, चाट मसाला आणि थोडे मीठ घालून हलकेच मिसळा.

 सारण तयार करणे

Picture Credit: Pinterest

तळलेल्या कॅटोऱ्यांमध्ये तयार केलेले बटाटा-चणे मिश्रण भरा.

 कॅटोऱ्या भरणे

Picture Credit: Pinterest

प्रत्येक कटोरीत गोड दही, हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी घाला.

 चटण्या आणि दही 

Picture Credit: Pinterest

शेवटी वरून थोडे लाल तिखट आणि चाट मसाला शिंपडा.

 चाट मसाला

Picture Credit: Pinterest