विटामिन बी 12 ची लक्षणे कोणती, जाणून घ्या

Lifestyle

26  February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

जास्त काम न करता देखील थकवा, आळस आणि अशक्तपणा जाणवणे हे विटामिन बी 12 चे लक्षण असू शकते. शरीराला जास्त ऊर्जा मिळत नाही.

सतत थकवा

Picture Credit: Pinterest

बी१२ च्या कमतरतेमुळे नसांवर परिणाम होतो. हातपायांमध्ये मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा जळजळ होणे ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये.

हात आणि पायांना मुंग्या 

Picture Credit: Pinterest

विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण, विसरणे आणि गोंधळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

स्मरणशक्ती कमकुवत होणे

Picture Credit: Pinterest

रेड ब्लड सेल्स  कमी झाल्याने त्वचा पिवळी किंवा फिकट दिसू शकते. हे अशक्तपणाचे लक्षण असू शकते, जे बी १२ च्या कमतरतेशी संबंधित आहे.

त्वचा पिवळी होणे 

Picture Credit: Pinterest

वारंवार चक्कर येणे

पायऱ्या चढताना किंवा अचानक उभे राहिल्यावर चक्कर येणे कमी होण्याचे संकेत असू शकते. रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता असण्याचे जाणवते.

Picture Credit: Pinterest

बी१२ च्या कमतरतेमुळे वारंवार तोंडात अल्सर, सूज किंवा जीभेची जळजळ होऊ शकते. वेळेवर निदान आणि उपचार अत्यंत आवश्यक आहेत 

तोंडाचे व्रण

Picture Credit: Pinterest

बी 12 कमतरतेची लक्षण जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

काळजी कशी घ्यावी

Picture Credit: Pinterest