थंडी, धुके आणि कमी तापमानाचा परिणाम बाईकच्या बॅटरीपासून टायर्सपर्यंत अनेक पार्ट्सवर होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात या 7 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
Picture Credit:pinterest
थंड वातावरणात बाईकची बॅटरी कमजोर होऊन इंजिन सुरू करताना अडचण येऊ शकते. बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ ठेवा आणि कनेक्शन व्यवस्थित आहेत का ते तपासा.
Picture Credit:pinterest
थंडीमध्ये टायरमधील हवेचा दाब कमी होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा टायर प्रेशर तपासा. टायरमध्ये क्रॅक किंवा झीज असल्यास दुर्लक्ष करू नका.
Picture Credit:pinterest
हिवाळ्यात धूळ, चिखल आणि ओलाव्यामुळे बाईकच्या चेनला गंज लागू शकतो. त्यामुळे चेन क्लीनरने स्वच्छता करा आणि योग्य चेन ल्युब्रिकंटचा वापर करा.
Picture Credit:pinterest
थंड वातावरणात इंजिन ऑइलच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऑइल लेव्हल आणि योग्य ग्रेड तपासा. लिक्विड कूल्ड बाइक असल्यास कूलंटची पातळीही तपासा.
Picture Credit:pinterest
धुक्यामुळे आणि ओल्या रस्त्यांमुळे ब्रेक लावताना अधिक काळजी घ्यावी लागते. ब्रेक पॅड्स, ब्रेक फ्लुइड आणि ब्रेकिंग रिस्पॉन्स तपासा. घसरणाऱ्या रस्त्यावर अचानक ब्रेक लावणे टाळा.
Picture Credit:pinterest
हिवाळ्यात बाईकवर ओलावा आणि धूळ साचल्याने गंज लागू शकतो. वेळोवेळी बाईक स्वच्छ करा. धुतल्यानंतर मेटल पार्ट्स आणि कोपरे कोरड्या कापडाने पुसून घ्या.
Picture Credit:pinterest
बाईक सतत धुके, पाऊस आणि ओलाव्याच्या संपर्कात राहणार नाही याची काळजी घ्या. शक्य असल्यास झाकलेल्या जागेत पार्क करा. कव्हर वापरताना बाइक कोरडी असल्याची खात्री करा.
Picture Credit:pinterest
थंड इंजिन सुरू केल्यानंतर काही वेळ ते आयडलिंगवर ठेवा. सुरुवातीची काही मिनिटे बाईक हळू चालवा. अचानक वेग वाढवणे टाळा आणि नियमित सर्व्हिसिंग करा.
Picture Credit:pinterest