Written By: Mayur Navle
Source: Yandex
लहान मुलांवरील संस्कार हे त्यांच्या आई वडिलांच्या वर्तवणुकीवर अवलंबून असते.
पण आई वडिलांमधील सततचे मतभेद हे मुलांवर वाईट परिणाम करू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
सततचं भांडण मुलांच्या मनात भीती, चिंता आणि असुरक्षितता निर्माण करते.
पालक सतत एकमेकांना दोष देत असेल तर मुलांना काय बरोबर आणि काय चूक हे समजणं कठीण जातं.
मुलं लवकर रडतात, चिडचिड करतात किंवा एकटी पडायला लागतात.
पालकांच्या सततच्या भांडणामुळे मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो आणि अभ्यासात लक्ष लागत नाही.
मुलांना नात्यांमध्ये फक्त संघर्ष आणि दु:खच दिसायला लागतं.
चिंता आणि भीतीमुळे मुलांना नीट झोप लागत नाही, त्यांना स्वप्नातही वाईट प्रसंग दिसू लागतात.