श्रावणाला सुरुवात होण्याआधी आषाढ अमावस्या येते.
Img Source: Pinterest
या अमावस्येला दिप अमावस्या असं म्हणतात.
या दिवशी अनेकजण मांसाहार करतात कारण श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो.
आषाढा अमावस्येला गटारी असं म्हणतात.
मात्र गटारी हा शब्द अत्यंत चुकीचा आहे.
आषाढी अमावस्य़ेला गतहारी असं म्हटलं जातं.
गत आणि आहार यांचा एकत्र झालेला शब्द गतहारी असा होतो.
गत सोडलेला आणि त्याग केलेला आणि आहार म्हणजे खाणं पिणं.
श्रावण सुरु होण्याआधी मांसाहार आणि मद्यपानाचं सेवन त्यागलं जातं.
मांसाहार ज्या दिवशी त्यागला जातो तो दिवस म्हणजे गतहारी अमावस्या.
मात्र या गतहारी अमावस्येचं मूळ अर्थ समजून न घेता गटारी असं चुकीच्या नावाने संबोधलं जातं.