थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येण्याचे प्रमुख कारण अशक्तपणा असू शकते. त्यावर मात करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत.
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी पालक, मेथी आणि हिरव्या पालेभाज्या खा, यामध्ये भरपूर लोह असते.
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा समावेश करा. यामध्ये कॅल्शिअम असते.
सफरचंद, डाळिंब आणि बीट रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर मानले जातात. त्यामुळे तुमच्या आहारांमध्ये फळांचा समावेश करा
रक्त वाढवण्यासाठी प्रथिने जसे की, अंड, मसूर आणि मासे हे चांगले मानले जाते. हे हिमोग्लोबिन सुधारण्यास देखील मदत करते.
प्रत्येक व्यक्तीच्या आहारामध्ये व्हिटॅमीन सी चा समावेश करणे गरजेचे आहे. संत्र, लिंबू आणि आवळा यांचा त्यामध्ये समावेश होतो.
आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. त्यामुळे तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे.
शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी नेहमीच चांगली असावी. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही गोळ्या किंवा सिरप घेऊ शकता.