उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कोणते पदार्थ टाळावेत

Lifestyle

20 March 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी योग्य खाणेपिणे गरजेचे आहे. चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. ज्याचा हृद्य आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

उच्च रक्तदाब आणि खाणे पिणे

Picture Credit: Pinterest

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब लवकर वाढू शकतो. यासाठी उच्च रक्तदाबाच्या समस्या असलेल्या लोकांनी मिठाचे सेवन करावे आणि प्रोसेस्ड फूडपासून दूर रहावे.

मीठ जास्त खाऊ नये 

Picture Credit: Pinterest

बर्गर, पिझ्झा आणि फ्राईज सारखे जंक फूडमध्ये मीठ आणि फॅट जास्त असते. याचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हे आहारापासून दूर ठेवा.

जंक फूड 

Picture Credit: Pinterest

बंद पॅकेट पदार्थ आणि हवा बंद डब्यामधील पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने रक्तदाब कंट्रोल ठेवणे कठीण होते. यामुळे घरी बनवलेले आणि ताजे  अन्न याला प्राधान्य द्या.

बंद पॅकेट पदार्थ

Picture Credit: Pinterest

गोड पेय

कोल्ड ड्रिंक आणि गोड पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असते. यामाध्ये साखर जास्त असते. जे रक्तदाब आणि वजन वाढवण्यास मदत करते.

Picture Credit: Pinterest

तळलेल्या पदार्थामध्ये अनहेल्दी फॅट जास्त असते. याचे सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉल वाढू शकते आणि हृदयावर ताण येतो. ज्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे.

तळलेले पदार्थ 

Picture Credit: Pinterest

अल्कोहोलचे सेवन उच्च रक्तदाबाच्या लोकांसाठी हानिकारक असू शकते. हे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे यापासून दूर रहा.

अल्कोहोल 

Picture Credit: Pinterest