Published : 15 Nov 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
२०१९ ची निवडणूक झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक वेळा कूस बदलली.
२०१९ ची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजपा युतीने एकत्र लढविली होती.
२०१९ च्या निवडणुकीत २८८ विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची सरासरी आकडेवारी ६१.४ टक्के एवढी होती.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपाने १ कोटी ४२ लाख मतदान घेऊन १०५ जागा जिंकल्या होत्या.
तर शिवसेनाने २०१९ साली ९० लाख ४९ हजार इतके मतदान आणि ५६ जागा जिंकता आल्या.
.
२०१९ च्या विधानसभेत २४ महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यापैकी दोन अपक्ष आमदार होत्या.
.
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
.
मात्र बहुमत सिद्ध करण्याआधीच २६ नोव्हेंबर २०१९ रोजी बहुमत सिद्ध करण्यात अपयश येत असल्याचे पाहून दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिला.
.