जर तुम्ही महिनाभर अंघोळ केली नाही तर काय होईल?

lifestyle

28 October, 2025

Author: मयूर नवले

आपले शरीर स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी रोज अंघोळ करणे गरजेचे.

स्वच्छ शरीर

Picture Credit: Pinterest

मात्र, काही जणांना रोज अंघोळ करण्याचा कंटाळा येत असतो.

काहीना कंटाळा

मात्र, जर तुम्ही महिनाभर अंघोळ केली नाही तर काय होईल?

असाही एक प्रश्न

त्वचेवर घाम, धूळ आणि तेल साचल्याने बॅक्टेरिया आणि फंगल संसर्ग होऊ शकतो.

जंतू आणि बुरशींची वाढ

घाम आणि त्वचेवरील मृत पेशींमुळे शरीरातून तीव्र दुर्गंध येऊ लागतो.

दुर्गंधीचा त्रास

अंघोळ न केल्याने त्वचा चिकट व तेलकट होते आणि खाज, पुरळ किंवा फोड येऊ शकतात.

त्वचेला खाज येइल 

केस आणि टाळू धुतले नाहीत तर कोंडा, खाज आणि केसगळतीचा त्रास होऊ शकतो.

केसांचा कोंडा वाढतो

फंगल इन्फेक्शन, स्किन इन्फ्लेमेशन आणि बॅक्टेरियल संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

संसर्गजन्य आजारांचा धोका