अनेकदा घाईघाईत ऑफिसला जायचंय किंवा कामात बरेच जण नाश्ता करतच नाहीत
पण सकाळचा नाश्ता तुम्ही न खाल्ल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो तुम्हाला माहीत आहे का?
डॉक्टरांनुसार, सकाळचा नाश्ता केल्याने शरीराला ग्लुकोज मिळते आणि ब्लड शुगरदेखील राखले जाते
रोज सकाळी नाश्ता न केल्यास संपूर्ण दिवस चिडचिड होते कारण शरीरातील सेरोटोनिन नावाचा स्तर कमी होतो
ब्रेकफास्ट न खाल्ल्याने दुपारी जेवण जास्त खाल्ले जाते आणि यामुळे वजन त्वरीत वाढते
एक्स्पर्टनुसार, जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांना हार्ट अटॅक, ब्लड प्रेशरच्या, स्ट्रोकचा धोका राहतो
नाश्ता न करणाऱ्या व्यक्तींमध्ये डायबिटीस 2 चा धोका अधिक आहे, कारण ब्लड शुगर नियंत्रणात राहत नाही
सकाळचा नाश्ता हेल्दी असेल तर संपूर्ण दिवस तुम्ही एनर्जेटिक राहता, अन्यथा चक्कर येणे, डोकं दुखणं, अशक्तपणा जाणवतो
सकाळचा नाश्ता कधीही Skip करू नका आणि वेळेवर, भरपूर पोटभर खा