लाखो रुपये किमतीच्या नवीन गाड्यांची क्रॅश टेस्ट केली जाते. आणि क्रॅश टेस्टनंतरच गाड्या लाँच केल्या जातात.
Picture Credit: Tata evofficial
पण, तुम्हाला माहिती आहे का? क्रॅश टेस्ट केल्यानंतर गाड्यांचे काय होते? चला तेच जाणून घेऊया.
तुम्हाला वाटत असेल की गाड्या क्रॅश टेस्ट केल्यानंतर दुरुस्त करुन त्या पुन्हा विकल्या जातात, तर तसे नाही. मग काय होते?
गाडी बाजारात येते त्यावेळी तिची सेफ्टी रेटिंग तपासले जाते.
भारतात एनसीएपी आणि ग्लोबल एनसीएपी यांसारख्या संस्था नवीन वाहनांना काँक्रीटच्या भिंती आणि लोखंडी खांबांवर उच्च वेगाने आदळून त्याची चाचणी करतात.
चाचणीदरम्यान एका जोरदार धडकेनंतर एअरबॅग्ज उघडतात, बोनेटचा चक्काचूर होतो आणि गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त होते.
आता या लाखो किमतीच्या गाड्यांचे काय होते? तर त्यांची चाचणी पूर्ण झाल्यावर ही वाहने भंगारमध्ये टाकली जातात.
नियमांनुसार, चाचणी उत्तीर्ण झालेले कोणतेही वाहन पुन्हा रस्त्यावर चालण्यास किंवा विकण्यास सक्त मनाई आहे.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, या गाड्या थेट भंगारमध्ये पाठवल्या जातात.
कंपन्या उरलेले प्लास्टिकचे भाग, टायर किंवा इंजिनचे घटक पुनर्वापर करु शकतात. परंतु वाहनाचा मुख्य भाग कायमचा नष्ट होतो.