फोन बाइकला लावण्याआधी जाणून घ्या! Vibration-Damping Mount काय करतो?

Automobile

13 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

इंजिन आणि खडबडीत रस्त्यांमुळे बाइकच्या हँडलबारमध्ये कंपने निर्माण होतात. फोन थेट हँडलबारला जोडलेला असल्यास ही कंपने फोनपर्यंत पोहोचू शकतात.

बाइकच्या कंपनांचा फोनला कसा धोका?

Picture Credit: pinterest

काही स्मार्टफोनमध्ये OIS म्हणजे Optical Image Stabilization आणि Autofocus साठी हलणारे सूक्ष्म घटक असतात. दीर्घकाळ तीव्र कंपनांचा संपर्क आल्यास त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

फोनचा कॅमेरा बिघडू शकतो?

Picture Credit: pinterest

हा फोन माउंट आणि बाइकच्या हँडलबारमधील कंपनांचा परिणाम कमी करण्यासाठी तयार केलेला असतो. यात रबरसारखे शॉक-अ‍ॅब्झॉर्बिंग घटक किंवा खास सस्पेन्शन यंत्रणा असू शकते.

मग काय आहे Vibration-Damping Mount?

Picture Credit: pinterest

माउंटमधील डॅम्पिंग यंत्रणा बाइककडून येणाऱ्या कंपनांचा काही भाग शोषून घेते किंवा फोनपर्यंत पोहोचणारी कंपने कमी करते. त्यामुळे कॅमेऱ्याच्या संवेदनशील घटकांवरील कंपनांचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

हे Gadget नेमकं काम कसं करतं?

Picture Credit: pinterest

GPS नेव्हिगेशन वापरणारे, रोज बाइकने प्रवास करणारे आणि फोन हँडलबारवर लावणारे रायडर्स याचा विचार करू शकतात. मात्र माउंटचा प्रकार बाइक आणि फोनशी सुसंगत असणं महत्त्वाचं आहे.

कोणत्या रायडर्ससाठी उपयोगी?

Picture Credit: pinterest

– फोनचा आकार आणि माउंटची Compatibility – कंपनं कमी करणारी स्वतंत्र Dampening यंत्रणा – फोन घट्ट पकडणारी Locking System – बाइकच्या हँडलबारशी सुसंगत फिटिंग

माउंट खरेदी करताना या गोष्टी तपासा

Picture Credit: pinterest

नाही! डॅम्पर कंपनांचा परिणाम कमी करतो; पण कॅमेऱ्याचं नुकसान होणारच नाही, याची हमी देत नाही. Apple ने विशेषतः जास्त क्षमतेच्या इंजिनमधून निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनांबाबत iPhone वापरकर्त्यांना सावध केलं आहे.

Mount लावला म्हणजे धोका पूर्णपणे टळतो?

Picture Credit: pinterest

योग्य डॅम्पर वापरा, फोनचा माउंट नियमित तपासा आणि गरज नसताना फोन बाइकवर लावून ठेवू नका. शक्य असल्यास बाइकच्या उत्पादकाच्या आणि फोनच्या उत्पादकाच्या सूचनांचं पालन करा. फोनच्या कॅमेऱ्याला संरक्षण देण्यासाठी खबरदारी हाच उत्तम उपाय!

फोन सुरक्षित ठेवण्यासाठी ही काळजी घ्या!

Picture Credit: pinterest