Published Oct 23, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
सूर्य हा सगळ्यात मोठा तारा असून सूर्याचा जन्म 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला आहे.
काही तारे मृत होताना काही भाग शिल्लक राहिला त्यातून सूर्याची निर्मिती झाली.
सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला मोठा गोळा आहे.
सूर्याचं बाह्य आवरण हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम या तत्वांपासून बनलेलं आहे.
सूर्य हा एक चुंबकीय सक्रिय तारा आहे.
हायड्रोजन फ्यूजनने सूर्याच्या गाभ्याला प्रज्वलित केले, ज्यामुळे तारा प्रकाश आणि उष्णता उत्सर्जित करू लागला.
सूर्य हा सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे.
पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात.
सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला सुमारे 365 दिवस लागतात.
सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान येऊन चंद्राने पृथ्वीवरून दिसणारा सूर्याचा दर्शनी भाग झाकला की सूर्यग्रहण होते.