नात्याच्या डिक्शनरीत सध्याचे Gen-Z वेगवेगळ्या शब्दांची वाढ करत आहेत. कुठेच गंभीरता नात्यात दिसून येत नाही
काही जणांकडून तुम्ही लव्ह बॉम्बिंग हा शब्द नक्कीच ऐकला असेल, पण म्हणजे काय हे कळलं नसेल
सुरूवातीला अत्यंत प्रेमळ बोलणं, वेगवेगळी स्वप्नं दाखवली जाणं आणि ती व्यक्ती आयुष्यात आली की, फक्त धोका देणं
सामान्य भाषेत सांगायचे झाले तर नात्यात धोका मिळण्याला लव्ह बॉम्बिंग म्हटलं जातं. पहिले प्रेमाची नाटकं आणि मग ब्रेकअप
लव्ह बॉम्बिंगमध्ये सुरूवातीला तुमचा वा तुमची जोडीदार तुम्हाला खूपच स्पेशल फील करून देतात. पण हे सर्वच खोटं असतं
एखाद्याच्या भावना आणि त्या माणसाचा वापर करून घेणं म्हणजे लव्ह बॉम्बिंग. हे नात्यातील अत्यंत धोकादायक स्वरूप आहे
लव्ह बॉम्बिंगमध्ये फसवणूक झाल्यास व्यक्तीच्या मनावर अनेकदा खोलवर परिणाम होऊ शकतो. नैराश्याच्या गर्तेत माणूस जाऊ शकतो
तुम्ही असलेल्या नात्यात तुम्हाला कुठेही शंका येत असेल आणि गोष्टी पटापट घडत आहेत वा ओव्हर होत आहेत लक्षात झाल्यास सतर्क व्हा