Published March 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
मराठी विवाहसंस्कृतीत अनेक विविध परंपरा आणि त्यामागे काही ना काही शास्त्र हे असतं.
लग्नाबाबतची अशीच एक प्रथा म्हणजे मुहुर्तमेढ रोवणं.
मुहुर्तमेढ रोवणं ही फार प्राचीन परंपरा आहे.
याबाबत वेडींग घर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
मुहुर्तमेढ म्हणजे लग्नकार्यासाठी सुरक्षाकवच मानलं जातं.
जवळच्या कोणाचं निधन झालं आणि सुतक लागलं तरी लग्न निर्वघ्नपणे पार पडतं.
शास्त्रात असं म्हटलं जातं की, मुहुर्तमेढ रोवल्यानंतर लग्न निर्विघ्नपणे पार पडते.
मुहुर्तमेढ म्हणजे लग्नमंडपातील प्रत्येक खांबांना देवता मानून त्याची पूजा केली जाते.
असं केल्याने वाईट शक्तीपासून नवं विवाहित जोडप्याचं संरक्षण होते.