www.navarashtra.com

Published Nov 13,  2024

By  Harshada Jadhav

आमंत्रण आणि निमंत्रणमध्ये नेमका फरक तरी काय? 

Pic Credit -  pinterest

लग्नकार्य किंवा एखादा कार्यक्रमचे आमंत्रण द्यायला आपण एखाद्याच्या घरी जातो. 

आमंत्रण 

या कार्यक्रमांसाठी पत्रिका देखील छापल्या जातात. काही पत्रिकांमध्ये आमंत्रण तर काही पत्रिकांमध्ये निमंत्रण लिहीलेलं असतं.

पत्रिका

आमंत्रण आणि निमंत्रण हे दोन शब्द एकाच अर्थाने बऱ्याचदा वापरले जातात. 

अर्थ

दोन्ही शब्द एकसारखेच वाटत असले तरी या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगळा आहे. 

वेगळा अर्थ 

जेव्हा एखाद्या कार्यक्रमात वेळेत उपस्थित राहण्याचे बंधन नसते, त्याला आमंत्रण असं म्हणतात. 

आमंत्रण 

निमंत्रण म्हणजे ज्या कार्यक्रमांमध्ये वेळेवर उपस्थित राहणं बंधनकारक असतं.

निमंत्रण 

ज्या कार्यक्रमांसाठी आमंत्रित केलं जात, त्यांची रुपरेषा ठरलेली नसते. तर ज्या कार्यक्रमांसाठी निमंत्रित केलं जात, त्यांची रुपरेषा ठरलेली असते

रुपरेषा

वाढदिवसाची पार्टी किंवा लग्नाचे रिसेप्शन ही आमंत्रणाची उदाहरण ठरू शकतात. अशा कार्यक्रमांमध्ये मुहूर्ताला विशेष महत्व नसतं. 

आमंत्रणाची उदाहरण

लग्न समारंभ किंवा मुंज इत्यादी कार्यक्रमावेळी निमंत्रण दिलं जातं. कारण असे कार्यक्रम मुहूर्तावर होणं गरजेचं असतं.

मुहूर्त

निमंत्रण विशेष असतं. ते आपल्या जवळच्या व्यक्तिंना आणि प्रियजनांना दिलं जातं. 

प्रियजन