Butterfly आणि Scissor Doors एकसारखे नाहीत! जाणून घ्या नेमका फरक

Automobile

10 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

सामान्य कारचे दरवाजे बाजूला उघडतात. पण काही लक्झरी आणि स्पोर्ट्स कारमध्ये दरवाजे वरच्या दिशेने उघडतात. यामध्ये Butterfly आणि Scissor Doors या दोन लोकप्रिय स्टाइल्स आहेत.

हटके डिझाइन

Picture Credit:pinterest

Butterfly Doors उघडताना दरवाजे वरच्या दिशेने आणि बाहेरच्या बाजूला पसरतात. त्यामुळे फुलपाखराचे पंख उघडल्यासारखा लूक दिसतो.

Butterfly Doors म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

Scissor Doors उघडताना दरवाजे जवळपास सरळ वरच्या दिशेने जातात. ते कारच्या बॉडीजवळच उभे राहतात. त्यामुळे या डिझाइनला कात्रीसारखा लूक मिळतो.

Scissor Doors म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

Butterfly Doors वर आणि बाहेरच्या बाजूला उघडतात. तर Scissor Doors मुख्यतः उभ्या दिशेने वर उघडतात. हाच दोन्हीमधील सर्वात मोठा फरक आहे.

उघडण्याच्या पद्धतीत फरक

Picture Credit:pinterest

Butterfly Doors उघडताना बाजूला अधिक जागा लागू शकते. Scissor Doors मध्ये बाजूला तुलनेने कमी जागा लागते. मात्र दोन्हींसाठी पुरेशी उंची आवश्यक असते.

जागेच्या बाबतीत कोणते वेगळे?

Picture Credit:pinterest

McLaren P1, BMW i8 आणि काही सुपरकार्समध्ये Butterfly Door डिझाइन पाहायला मिळते. ही स्टाइल कारला खास स्पोर्टी लूक देते.

Butterfly Doors कुठे दिसतात?

Picture Credit:pinterest

Lamborghini Aventador आणि Lamborghini Revuelto सारख्या कारमध्ये Scissor Doors पाहायला मिळतात. Lamborghini ची ही खास ओळख बनली आहे.

Scissor Doors कुठे दिसतात?

Picture Credit:pinterest

दोन्ही प्रकारच्या दरवाजांसाठी विशेष हिंज, स्ट्रक्चर आणि इंजिनिअरिंगची गरज असते. त्यामुळे सामान्य दरवाजांच्या तुलनेत त्यांचा खर्च अधिक असू शकतो.

कोणते डोअर डिझाइन महाग?

Picture Credit:pinterest

लूक आणि ड्रामॅटिक एंट्रीसाठी Butterfly Doors आकर्षक वाटतात. तर Lamborghini सारखा आयकॉनिक सुपरकार लूक हवा असेल तर Scissor Doors खास ठरतात. दोन्हींची निवड कारच्या डिझाइनवर अवलंबून असते.

कोणते डिझाइन भारी?

Picture Credit:pinterest