www.navarashtra.com

Published Nov 16,  2024

By  Harshada Jadhav

RuPay, VISA आणि MasterCard मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

Pic Credit -  pinterest

तुम्ही कार्डवर नीट पाहिलं तर RuPay, VISA आणि MasterCard असं लिहीलेलं दिसेल.

कार्ड

RuPay हे भारतीय पेमेंट नेटवर्क आहे. तर व्हिसा आणि मास्टरकार्ड या परदेशी पेमेंट नेटवर्क कंपन्या आहेत.

पेमेंट नेटवर्क

व्हिसा हे जगातील सर्वात मोठे पेमेंट नेटवर्क आहे. त्याची कार्ड्स जगभरात स्वीकारली जातात.

व्हिसा 

क्लासिक कार्ड हे व्हिसा कंपनीचं बेसिक कार्ड आहे. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही त्यातून कॅश काढू शकता.

बेसिक कार्ड

गोल्ड आणि प्लॅटिनम कार्डमधून ट्रॅव्हल असिस्टंस, ग्लोबल कस्टमर असिस्टंस आणि ग्लोबल एटीएम नेटवर्कचे फायदे मिळातात.

ग्लोबल एटीएम नेटवर्क

मास्टरकार्डमध्ये स्टँडर्ड डेबिट कार्ड, एन्हांस्ड डेबिट कार्ड आणि वर्ल्ड डेबिट मास्टरकार्ड असे प्रकार आहेत.

मास्टरकार्ड

मास्टरकार्डमध्येही युजरला व्हिसा कार्डसारख्या अनेक सुविधा मिळतात आणि ते जगभर स्वीकारलं जातं.

मास्टरकार्ड युजर

रुपे हे भारतीय पेमेंट नेटवर्क आहे. हे कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) लाँच केलं आहे. 

रुपे 

रुपेमध्ये क्लासिक, प्लॅटिनम आणि सिलेक्ट कार्डचा समावेश आहे. हे व्हिसा किंवा मास्टरकार्ड प्रमाणेच कार्य करतं.

रुपे कार्ड

व्हिसा आणि मास्टर कार्डची ऑपरेशन फी जास्त आहे. रुपे कार्डची ऑपरेशन फी खूपच कमी आहे.

ऑपरेशन फी 

जगातील प्रत्येक देशात व्हिसा आणि मास्टरकार्ड स्वीकारले जातात. रुपे कार्ड फक्त भारतातच वापरता येतं.

फरक

व्हिसा आणि मास्टरकार्ड घेतल्यास बँकेला दर तिमाहीला शुल्क द्यावं लागतं, पण रुपे कार्ड असल्यास बँकेला शुल्क द्यावं लागत नाही.

बँकेला शुल्क द्यावं लागतं