Published Dec 19, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
परदेशात जाण्यापूर्वी पासपोर्ट तसेच व्हिसासाठी अर्ज करावा लागतो.
परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हे सर्वात महत्त्वाचा कागदपत्र आहे.
पासपोर्ट तुमचे नागरिकत्व देखील दर्शवते.
पासपोर्ट कायद्यांतर्गत परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केले जाते.
सामान्य पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि अधिकृत पासपोर्ट असे तीन प्रकार आहेत.
पासपोर्टमध्ये व्यक्तीचे नाव, छायाचित्र, नागरिकत्व, पालक आणि लिंग असते.
पासपोर्टशिवाय तुम्ही कोणत्याही देशात व्हिसासाठी अर्ज करू शकत नाही.
दुसऱ्या देशात प्रवेश करण्यासाठी व्हिसा हा एक प्रकारचा अधिकृत डॉक्युमेंट आहे.
ठराविक कालावधीसाठी व्हिसा जारी केला जातो.
तुम्ही एखाद्या विशिष्ट देशात किती दिवस राहू शकता आणि तुम्हाला तो देश कधी सोडावा लागेल, हे व्हिसावर अवलंबून असतं.
एखाद्या व्यक्तीकडे पासपोर्ट असेल तरच त्याला व्हिसा दिला जाऊ शकतो.