धार्मिक कार्यात तुळशीचं महत्व जास्त आहे.
Img Source: Pintrest
धर्मशास्त्रनुसार भगवान विष्णूंच्या नैवेद्यावर तुळशीचं पान हे असायलाच हवं.
तुळस इतकी महत्वाची का ? याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टा अकाउंटवरून माहिती दिली आहे.
धर्म शास्त्र असं सांगतं की, तुळशीच्या पानात सात्विकता अधिक असते.
तुळशीच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक असते.
असं म्हणतात की, श्रीकृष्णाचं तत्व हे तुळशीच्या पानात अधिक असतं.
तुळशीची पानं महत्वाची असण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.
तुळशीच्या पानांत औषधी गुणधर्म अधिक असतात.
नैवेद्यावर तुळशीची पाने ठेवल्याने औषधी घटक त्यात मिसळतात.
नैवेद्याच्या निमित्ताने तुळशीचं पान आपल्या पोटात जावं हाच यामागचा उद्देश आहे.