आद्यदेव म्हणून पहिले गणेशपूजन करुन शुभ कार्याला सुरुवात केली जाते.
Picture Credit: Pinterest
गणपतीच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.
अशीच एक कथा गणपतीच्या चार हातांची देखील सांगितली जाते.
बाप्पाच्या हातात अंकुश आहे. हत्तीला नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो.
याचा अर्थ म्हणजे,बाप्पाचा हा हात मन आणि इच्छांवर नियंत्रण दर्शवतो.
बाप्पाच्या दुसऱ्या हाता पाश आहे. पाश म्हणजे दोरखंड.
याचा अर्थ असा की, पाश हे अज्ञान आणि स्वार्थ यांच्यापासून दूर नेतो.
बाप्पाचा तिसरा हात आशीर्वाद मुद्रा आहे.
याचा अर्थ म्हणजे बाप्पा आपल्या भक्तांना कायमच कठीण काळात आशीर्वाद देत असतो.
बाप्पाच्या चौथ्या हातात मोदक आहे.
बाप्पाच्या हातातील मोदक आनंद आणि समाधानाचे प्रतीक दर्शवतो.