Published Jan 08, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
ज्या लोकांचा वाढदिवस 1 किंवा 10, 19, 28 या तारखांमध्ये येतो त्यांचा मूलांक १ असतो.
मूलांक १ असणाऱ्या व्यक्तिमत्वावर सूर्याचा प्रभाव असतो.
पुढाकार घेणे हा त्यांचा स्वभाव आहे. लोकांना मार्गदर्शन करण्यात ते उत्तम असतात.
मूलांक १ असणारे लोकं त्यांच्या मनाचे राजे आहेत. त्यांना कुणाच्या नियंत्रणाखाली काम करण्यास आवडत नाही.
मूलांक १ असणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो. तसेच ते फार प्रभावी आणि वजनदारदेखील असतात.
जे गोष्टी ठरवतात ते साध्य करण्यात कसलीही कमतरता सोडत नाहीत. ते वृत्तीने फार कडक असतात.
मूलांक १ असणाऱ्या व्यक्तींमध्ये पारदर्शकता महत्वाची आहे. त्यांना खोटं मुळीच आवडत नाही.