Published Dec 10, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
देशाची राजधानी दिल्ली शहरातील कर्तव्य पथवर इंडिया गेट स्थित आहे.
इंडिया गेट हे केवळ एक स्मारक नाही तर ते शौर्य आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते.
दिल्लीमध्ये स्थित असणाऱ्या या इंडिया गेटची उंची 42 मीटर आहे.
पहिल्या महायुद्धात आणि तिसऱ्या अफगाण युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेट बांधण्यात आला.
इंडिया गेट ही दिल्ली शहरातील एक प्रमुख ऐतिहासिक वास्तू आहे.
इंडिया गेटचे बांधकाम 1921 मध्ये सुरू झाले आणि 10 वर्षांनंतर 1931 मध्ये पूर्ण झाले.
प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद सर एडविन लुटियन्स यांनी इंडिया गेटची रचना केली होती.
12 फेब्रुवारी 1931 रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
युद्धात मरण पावलेल्या 13,313 ब्रिटीश आणि भारतीय सैनिकांची नावे या स्मारकावर कोरलेली आहेत.
या स्मारकावर "इंडिया" असे लिहिलेले आहे.
तुम्हाला इंडिया गेटचे पूर्ण नाव माहित आहे का?
या स्मारकाचे पूर्ण नाव 'ऑल इंडिया वॉर मेमोरियल' असे आहे.