Published Dec 19, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
कर्ण आणि शनीदेव यांचा उल्लेख हिंदू पुराणात रवीपुत्र असा केला जातो.
जसं कौरव, पांडव आणि कृष्ण महत्वाचे आहेत तसंच कर्णाचा उल्लेख केल्याशिवाय महाभारताची गाथा अपूर्ण आहे.
कर्णाला रविपुत्र म्हणून ओळखलं जातं, तशीच ओळख शनीदेवांची सुद्धा आहे.
रविपुत्र असल्याने कर्ण आणि शनीदेव यांच्य़ात नक्की नातं काय हा प्रश्न अनेकांना पडतो.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार कर्ण आणि शनीदेव यांच्यात भावाचं नातं होतं.
कर्ण आणि शनीदेव हे योद्धा असल्याचं पुराणात म्हटलं जातं.
.
असं म्हणतात की सूर्यदेवाने दोन विवाह केले होते.
.
सूर्यदेवांची पहिली पत्नी संज्ञा हिला यम आणि यमी अशी अपत्य होती.
.
सूर्यदेवांची दुसरी पत्नी छाया हीचा अपत्य म्हणजे शनीदेव.
.
कर्णाची जन्मदाती आई कुंती होती. मात्र सूर्यदेवांचा विवाह कुंतीशी झाला नव्हता.
.
कुंतीने तपश्चर्या करुन सूर्यदेवांना प्रसन्न केलं . त्यावर कुंतीला सूर्यदेवांनी पुत्ररत्नाचं वरदान दिलं. .
.
कुंतीने मिळालेल्या वरदानाने कर्णाचा जन्म झाला. .
.
यामुळे कर्णाला सूर्यपुत्र म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच नात्याने कर्ण आणि शनीदेव बंधू असल्याचं म्हटलं जातं. .
.