अक्रोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

Lifestyle

24 August, 2025

Author: मयूर नवले

अक्रोडचे सेवन केल्याने आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा होतो. 

अक्रोड

Picture Credit:  Pexels

या ड्राय फ्रुटमध्ये ओमेगा-३ फॅटी पसिड, व्हिटॅमिन ई, फायबर आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे.

पोषक तत्व 

मात्र, हा ड्राय फ्रुट खाण्याची योग्य वेळ कोणती? चला याबद्दल  जाणून घेऊयात. 

योग्य वेळ कोणती? 

रात्री भिजवलेले 2 ते 3 अक्रोड सकाळी खाल्ल्याने मेंदूला ऊर्जा व पचनास मदत मिळते.

सकाळी रिकाम्या पोटी

दूध, ओट्स किंवा पोहे यामध्ये अक्रोड घातल्यास सकाळचा नाश्ता पौष्टिक होतो.

नाश्त्यासोबत

सकाळी 11 ते दुपारी 12 दरम्यान अक्रोड स्नॅक म्हणून घेतल्यास जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

मधल्या वेळच्या भुकेसाठी

सलाड किंवा दहीमध्ये अक्रोड घातल्यास अन्नातील पोषक तत्त्वांचे शोषण सुधारते.

दुपारच्या जेवणानंतर

व्यायामाआधी अक्रोड खाल्ल्यास प्रोटीन व ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे स्टॅमिना वाढतो.

वर्कआउटपूर्वी