अननस हे अत्यंत गुणकारी फळ असले, तरी ते खाताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अन्यथा घशाची जळजळ, पोटदुखी किंवा ॲलर्जीचा सामना करावा लागू शकतो.
Picture Credit: Pinterest
अननसात 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाईम असते, ज्यामुळे तोंडात किंवा जिभेवर खाज सुटू शकते किंवा जळजळ होऊ शकते. हे टाळण्यासाठी अननस कापल्यानंतर मिठाच्या पाण्यात काही वेळ भिजवून ठेवावे
Picture Credit: Pinterest
जास्त प्रमाणात अननस खाल्ल्यास पचनक्रिया बिघडून जुलाब, मळमळ किंवा छातीत जळजळ (ॲसिडिटी) होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
ज्या लोकांना दमा, त्वचेचे आजार (पित्त किंवा पुरळ) आहेत त्यांनी अननस खाणे टाळावे, कारण यामुळे ॲलर्जीचा त्रास वाढू शकतो
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही रक्त पातळ करणारी किंवा ॲण्टिबायोटिक्स औषधे घेत असाल, तर अननसाचे सेवन मर्यादित ठेवावे
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
अननसामध्ये गर्भाशय आकुंचन पावण्याचे गुणधर्म असतात, त्यामुळे गरोदर महिलांनी अननस खाणे किंवा त्याचा रस पिणे टाळावे
Picture Credit: Pinterest
अननसात साखरेचे प्रमाण (ग्लुकोज) जास्त असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचे सेवन करावे.