राखी बांधण्यापूर्वी किंवा नंतर भावाला औक्षण करण्याची परंपरा आहे. ताटात कुंकू, अक्षता, दिवा आणि फुले ठेवून भावाचे औक्षण केले जाते.
Picture Credit: Pinterest
बहिण भावाच्या कपाळावर कुंकू किंवा गंधाचा टिळा लावते आणि त्यावर अक्षता वाहते. हा शुभत्वाचा आणि मंगलकामनेचा भाग मानला जातो.
Picture Credit: Pinterest
भावाच्या उजव्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली जाते. राखी बांधताना भावाच्या सुख-समृद्धीची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.
Picture Credit: Pinterest
राखी बांधल्यानंतर भावाचे तोंड गोड करण्याची पद्धत आहे. पेढा, बर्फी, लाडू, किंवा घरी तयार केलेली मिठाई यापैकी काहीही देऊ शकता.
Picture Credit: Pinterest
काही कुटुंबांमध्ये राखीसोबत भावाला नारळ, फळ किंवा पारंपरिक सणाचा प्रसाद दिला जातो. हे शुभतेचे प्रतीक मानले जाते.
Picture Credit: Pinterest
राखीबरोबर भावाला कपडे, पाकीट, पुस्तक, घड्याळ किंवा त्याच्या आवडीची एखादी वस्तू भेट देऊ शकता.
Picture Credit: Pinterest
राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेट देतो आणि तिच्या सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा देतो.
Picture Credit: Pinterest