Published Feb 24, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - Google
भारतीय संस्कृतीत जेवणाच्या ताटात सगळे पदार्थ असातात.
गोड, तिखट, आबंट या अशा विविध चवींच्या प्रकरांचा समावेश जेवणात असतो.
जेवणाचं ताट वाढल्यावर अनेक जण पहिला घास हा गोडाचा घेतात.
जेवताना पहिला घास कशाचा घ्यावा याबाबत आरोग्य तज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी सांगितलं आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जेवताना पहिला घास या भाजीचा घ्या.
भाजीनंतर सलाड खावं आणि मग पोळी भाजी खावी. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
भाज्यांच्यामध्ये नैसर्गिक मधुररस असतो. या रसामुळे जेवण पचायला मदत होते, असं आयुर्वेद सांगत.
मधुमेहाच्या रुग्णांनी जेवताना भाजीचा घास पहिले घेतल्याने मधुमेहाचा त्रास वाढत नाही.